Posted by - Team LegaNet -
on - July 20, 2019 -
Filed in - Articles -
Leganet Advocate legal Lawyer legal help Indian law legal advice legal opinion online legal help law firms legal documents superstition Law Maharashtra -
1,269 Views - 0 Comments - 9 Likes - 0 Reviews
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि अंमलबजावणी
श्रद्धा व अंधश्रद्धा यामध्ये जास्त फरक नसतो, एखादी गोष्ट आंधळेपणाने स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा फोफावणे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. अंधश्रद्धेमुऴे निरपराध जीवांचे बळी जातात. काही ढोंगी लोकांमुळे ,अशिक्षितांमुळे व जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुऴे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत जाते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधनाच्या मार्गाने कार्य करणारी एक संघटना आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने सातारा येथे इ.स. १९८९ मध्ये या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संंक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ असे आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३’, जो सामान्यत: अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून ओळखला जातो, तो महाराष्ट्र राज्यात २६ ऑगस्ट २०१३ पासून अमलात आला. सध्या तरी देशभरात महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे आहे, की जिथे असा कायदा अस्तित्वात आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीची आज नेमकी स्थिती काय आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता चित्र निराशाजनक दिसते.
हे सर्व या कायद्याने गुन्हा आहे
जादूटोणा करणे आणि अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे या शब्दप्रयोगाची व्याख्या देऊन, भोंदूबाबा यांच्याकडून करण्यात येणारा जादूटोणा, अवलंबिल्या जाणार्या अनिष्ट व अघोरी प्रथा, तसेच, केली जाणारी अधिकृत व बेकायदेशीर वैद्यकीय औषधयोजना व उपचार यांच्या प्रचाराला व प्रसाराला प्रतिबंध करण्यात आला आहे. या अधिनियमाअन्वये या गोष्टी करणे हा अपराध ठरविण्यास आलेला आहे आणि या अधिनियमाची जरब बसविण्यासाठी असे अपराध दखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यास आले असून, त्यासाठी, अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या अधिनियमाच्या व नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे किंवा कसे, याचा तपास करणे व त्याला प्रतिबंध करणे, तसेच या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर परिणामकारकरीत्या खटले चालविले जाण्यासाठी साक्षीपुरावे गोळा करणे, याकरिता, एक दक्षता अधिकारी असण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ज्याने या कायद्याच्या तरतुदींखालील अपराध केला आहे अशा व्यक्तीच्या दोषसिद्धी संबंधातील तपशील प्रसिद्ध करण्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाला प्रदान करू शकेल अशी साहाय्यकारी तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे. नरेंद्र दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ ठरू नये, असे वाटत असेल, तर या कायद्याच्या अधिक व्यापक व अर्थपूर्ण अंमलबजावणीसाठी जोमाने प्रयत्न करावेच लागतील.
The first and largest ProCial network dedicated to legal fraternity
We are a secure community of active members who help you with your queries, post new updates and grow your network.